Thursday 1 December 2016

POULTRY
  
शेडची रचना:                                       
          १.कोंबडी घर शक्यतो पूर्व-पश्चिम असावे.            २.कोंबडी घराची रुंदी ३० फुट असावी.
3.लाईटची सोय असावी.
४.रस्त्यची सोय असावी.
५.कोंबडी घर दलदलीची ठिकाणी असू नये.
६.मुख्य रस्त्यापासून जवळ असावे                                7.शेड जवळ सावली देनारे छोटे झाडे लावावी.
८.शेड साठी सिमेंट पत्रे वापरावेत.
9.सिमेंटच्या पत्र्याचा आवाज येत नाही.
१०.थंड वाऱ्यापासून रक्षन मिळवण्यासाठी शेडच्या खिडक्यांना पडदे लावावेत.  
११. शेड मधील कोंबड्यांची विष्ठा, सांडलेले खाद्य नेहमी स्वच्छ करावे.
१२. सेड्चे छत,भिंती व बाजूच्या जाळ्या साफ कराव्या पाण्यात जंतुनाशक मिसळून शेड पूर्णपणे स्वच्छ करावे.

 कोंबडी पक्षी घरात आणण्यापूर्वी करावयाचे व्यवस्थापन

}१. पोल्ट्री पक्षी घरात आणण्यापूर्वी शेड स्वच्छ पाण्याने धुवून घेणे.
}२. पोल्ट्री घरास कळीचा चुना व फोर्मेलीन चे द्रावण घेऊन या मिश्रणाचा रंग शेडला देणे.
}3. पोल्ट्री चे पडदे बंद करून त्यात २५० ते ५००ml formalin आणी १kg bliching powder याचे मिश्रण बनवून द्रावण टाकून धूर करावा.
}४. १६lit पाण्यात ५०ml formalin टाकून फवारणी करावी.
}५. पोल्ट्री घरात शिरण्यापूर्वी चुन्याचा निवळीत पाय बुडवून जावावे.
}६. पोल्टी् घरात तूस व टरफले याचा 3-४ cm उंच थर द्यावा (पसरावा)
}7. वरील सर्व उपाय करून 24 ते 36 तासांनी पक्षी पोल्ट्री घरात आणावे.
}८. लाईटची सोय केलेली असावी.
}9. पक्षी आणल्यानंतर प्रवासाचा तान कमी करण्यासाठी ग्लुकोन गुळ पाणी.
}१०. त्यानंतर त्यांना prestarter खाद्य २ तासांनी द्यावे.
 तापमान / बुडींग व्यवस्थापन 

}१. अंड्यातून २१ दिवसांनी पिले बाहेर आणल्यानंतर त्याचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना कृत्रिमरीत्या ऊबी द्यावी म्हणजेच त्याचे ब्रूडीग करावे.

}२. बॉयलर कोंबड्यासाठी बुडिंग काळ हा एक दिवसापासून २-3 आठवड्यापर्यंत असतो .

}3. पिलांना पिसे येईपर्यत त्यांना साधारणता; १०ते 14 दिवस कृत्रिमरित्या ऊब द्यावी .

}४. पहिल्या आठवड्यात पिलांना रात्री ९५*f तापमान लागते.नंतर प्रत्येक आठड्यात ५*f ने कमी करावे.

}५. ब्रुडर उंची २-3 फुट असावे.

}६. बाल्बपासून पिले इर जात असतील, तर पक्ष्यांना उष्णता जास्त होने असे समजावे .

}7. ठर्मामीटर हे ब्रुडरच्या कडेला व पिलांच्या डोक्याच्या थोडे वर ठेवावे व हळूहळू प्रत्येक आठवड्याला ब्रुडरची संख्या कमी करावी.
 विविध जाती 

}१. अंडी देणारी जाती       :   white लेगहोर्न

}२. मांस उत्पादनासाठी जाती :    बॉयलर

}3. अंडी व मास उत्पादन    :  R.I.R, गिरीराज ,            वनराज,सुवर्णधारा  
        १. व्हाईट लेग हॉर्न  

}- पांढरी शुभ्र असल्याने व्हाईट लेग हॉर्न

}- नराला डोळ्यावर लाल रंगाचा तुरा असतो.

}- कानाची पाळी पांढरी असते.

}- अंडी उत्पादन वर्षाला २००-२५० देते.

}- नराचे वजन २ kg तर मदीचे वजन १.७ kg भरते. 
 २. ब्राऊन लेग हॉर्न 

}- या जातीचे ठेवण हे गुणधर्म व्हाईट लेग हॉर्न सारखेच असते.

}- ही कोंबडी दिवसाला आकर्षक पिसाचा रंग तपकिरी व नराचे शेपूट काळे असते.

}- सरासरी वर्षाला २८०-३०० अंडी देतात.
 3. R.I.R

}- शरीर भक्कम असते.

}- मास व अंडी उत्पादनात अग्रेसर

}- रंग चमकदार काळा, व लाल, अथवा विविध रंग असते.

}- दिसण्यास गावरान गावरान कोंबडी सारखी दिसले.

}- ही कोंबडी वर्षाला १८०-२०० अंडी देते.
 3. वनराज 

}- हे जात प्रामुख्याने अर्धबंधिस्त कुकुट-पालनासाठी योग्य आठ आठवडे वयाच्या कोंबडीचे वजन १ kg एवढे भरते.

}- सारासारी वर्षाकाठी १६०-१८० अंडी मिळतात. 
 ५. गिरीराज 

}- गिरीराज हा पक्षी दिसायला डौलदार असतो.

}- तो रंगाने काळा, तुरा सरळ, आणि पायाचा रंग काळा असतो.

}- गिरीराज कोंबड्यांची अंडी उबवणूकसाठी आणि सफल उत्पादनक्ष्म असतात.

}- या कोंबड्या २२-३४ आठवड्यानी अंडी देण्यास सुरवात करतात.

}- या कोंबड्या सरासरी वर्षाला १६० अंडी देतात .

}- या मध्ये नर मादीचे १:८ असे प्रमाण असते.

}- ६५-७० दिवसात कोंबड्यांचे वजन =१२००-१५०० gm इतके भरते.

}- पूर्ण वाढलेल्या कोंबड्याचे वजन ४ kg व कोंबडीचे वजन 3 kg असते.
 खाद्य

}- खाद्याचे प्रकार : चिक मश खाद्य ,२. ग्रोवर मश खाद्य ,3. लेयर मश खाद्य ४. लेयर कॉन्सट्रेट ,५. प्रीमिक्स

}- वरील पहिले तीन प्रकारचे खाद्य हे पूर्णतःतयार खाद्यात उपलब्ध असून ते कोंबड्यांना वयोगटानुसार घ्यावे. 
 खाद्य देतेवेळी घ्यवयाची काळजी 

}- कोंबडीची जात, प्रकार, प्रवर्ग, वयोगट, भोगोलिक वातावरण, उत्पादन क्षमता, कोंबड्याचे अनुवुंसिक गुणधर्म या बाबीचा विचार करून योग्य ते खाद्य घटक असलेले पौष्टीक व संतुलिक खाद्य कोंबड्यांना द्यावे.

}- प्रथिने, उर्जा, जीवनसत्वे, कार्बोदके व खनिजे इ. घटकांनी संतुलित असावे.
- खाद्य जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये.
 लेयर कोंबड्यांना ध्या संतुलित खाद्य

}- वयोगटानुसार खाद्यतील अन्नघटकाचे प्रमाण.
                                  
अन्नघटक
स्टार्टर (अ)
स्टार्टर (ब )
डेव्हलपर
प्रिलेअर
फेज१
फेज२
प्रथिने टक्के (किमान )
18
17
15.७०
१६.००
14.15
13.70
उर्जा किलो कॅलरी प्रतिकिलो
२८६०
२८००
२६८५
२६८०
२५२५
2550
कॅल्शियम टक्के (किमान )
१.२
१.२
१.२
२.५
3.9
4.05
फॉस्फरस टक्के (किमान )
0.४८
0.४६
0.४२
0.४२
0.40
0.38
लायसिन टक्के (किमान )
0.८९
0.८१
0.६८
0.७०
0.61
0.59
मिथिओनिन टक्के (किमान )
0.६७
0.६३
0.५६
0.५७    






Wednesday 9 November 2016


आवळा कॅन्डी 

||
स्वच्छ पाण्याने  धुऊन घेणे .
|
साफ टोकदार सुईने होल करून घेणे .
|
६% मिठ टाकणे व ते मिस्क करणे .व ते १२ तास भिजत ठेवणे .
|
१२ तास झाल्यानंतर ते मिठाच्या पाण्यातून काढून घेणे .
|
गरम पाण्यात उकळून घेणे .आवळ्याचे तुकडे होईपर्यंत गरम करणे .
|
गरम पाण्यातून काढून घेणे .
|
थंड पाण्यातून काढून घेणे
|
तुकडे करून घेणे / बिया काढून टाकणे .
|
वजन करून घेणे .
|
१:१  प्रमाण साखर टाकणे .
|
६ ते ७ दिवस ते झाकून ठेवणे .
|
सोलर ड्रायर मधे सुखावण्यासाठी ठेवणे .
|
ड्राय  झाल्यानंतर ते काढून घेणे .
|
आवळा कॅन्डी तयार :-पॅकिंग करून घेणे .
|
मार्केटिंग करणे .


मिरचीचे लोणचे
मिरची वजन करा [ १ kg ]
|
स्वच्छ धुऊन घेतले.
|
मिरचीचे देठ काडले.
|
चाकूने मिरचीचे तुकडे केले.
|
वजन करून तेल गरम करून घेतले.
|
तेल थंड होऊ द्या.
|
मेथी पावडर,हिंग,हळद,मोहरी डाळ,तेलात टाका.
|
मिरची परातीत टाका.
|
तेलातील मिश्रण मिरचीत मिक्स करा.
|
वजन करून २ वाट्या मीठ टाका.
|
आधी थोडे मीठ बरणीत टाका.
|
मिश्रण बरणीत भरा .
|
दोन दिवस बरणी उन्हात ठेवा.
|
दोन दिवसांनी बरणीत लिंबाचा रस घाला.
|
मिश्रण मिक्स करून बरणीचे झाकण पॅक लावा.

*मिरची १ kg

*मोहरी डाळ १३० gm

*मीठ २५० gm

* मेथी १ gm

*हिंग १ gm

* हळद ६ gm

* तेल १७० gm

*लिंबू ६ नग .


Sunday 23 October 2016

विभाग गृह आणि आरोग्य प्रात्यक्षिक : चिक्की बनवणे



साहित्य :- शेंगदाणे(२५०), साखर किंवा गुळ(२५०  ), तूप(1/२ चमचा), पाणी (२ चमचे )  
साधने :- पक्कड, कढई, उ़लथणे, सुरी, गॅस, पाठ, लाटन, इ.    
कृती :- शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्यावरील टलफले काढून पाकळ्या केल्या. गुळाचा पाक तयार
      केला. पाक तयार झाला आहे कि नाही ते पाहण्यासाठी वाटीत थोडे पाणी घेवून त्यात गुळाचा       
पाक थोडासा टाकून त्यामध्ये पाकची गोळी तयार झाली असेल तर आपला पाक तयार झाला.                 
पाकामध्ये शेगदाणे घालून एक मिनिट हलवून घेतले. व गॅस बंद केला. ते मिश्रण गरम
असतानाच पाठावर घेतले. लाटण्याच्या साह्याने पसरून घेतले. सुरीने कट केले. या पद्धतीने 
आम्ही चिक्की बनवली.

                                                                                    कोंबडी पालन व्यवसायाचे महत्व व संधी 
  
Ò भारत हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या देशात ७०/ जनता शेती करते.
Òशेतकऱ्याने शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीत बदल करून आधुनिक व त्यानंतरहायटेक पद्धतीने शेती करत आहोत.
Ò    शेतकऱ्याने शेती करत असताना आपण जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळण्याचाव्यवसाय कमी प्रमाणात सुरु केला.
Òव त्यानंतर लोक या व्यवसायाकडे लोक व्यवसाईक दृष्टीकोनातून पाहू लागले.गेल्या१० ते १२ वर्षात कुकुट पालन व्यवसायात झपाट्याने बदल झाला असून आजभारताचा या व्यवसायात चीन,अमेरिका,जपान,रशिया नंतर क्रमांकलागतो.कारण पूर्वी या व्यवसायास शेतीस पूरक जोडधंदा म्हणून असे.परंतु आजपरस्थिती बदललेली आहे.

 
Òजगात भारताचा ५ वा क्रमांक असला तरी अफाट लोकसंख्येमुळे दरडोहीअंड्याचे प्रमाण ३३ आणि चिकन मांस ५२५ gm पडते.वास्तविक शास्रीयदृष्टीने दरडोही १८० अंडी आणि ९ किलो मांस असणे आवश्यक आहे.म्हणूनया देशात विस्ताराची आवश्यकता आहे.
Òदेशाच्या विकासाचा वेग बघता ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत,व दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी  अतिरिक्त आयोडीन व सरोत्तम आहारासाठी कमीपुंजी लागणारा व्यवसाय आहे.म्हणून बरेच लोक या व्यवसायाकडे वळले
Òहा व्यवसाय खूप चांगला असला तरी सद्य परिस्थितीत त्यांना होणारे रोगव त्यावरील उपचाराचा खर्च बराच होत असल्याने फायदा कमी होतचालला आहे.त्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगावर  प्रतिबंधकलसीशिवाय पर्याय नाही.
Ò       म्हणून या व्यवसायाकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पहिले तर तोकरताना त्यातील लहान सहान गोष्टीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे.हाव्यवसाय करताना साहित्य साधने त्यांचा योग्य वापर ,पक्ष्यांचेसंगोपन व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
आहेत.